आयुष्य

''आयुष्य'' म्हणजे कटकट.. 
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं....

''आयुष्य'' म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं........

''आयुष्य'' म्हणजे ती ....
मनवाण्यासाठी तिला, मारावे लागतात मला जोर, 
ती एकदा बरोबर आली कि मग त्याला नाही कशाचीच तोड !!

''आयुष्य'' म्हणजे प्रेम .......
धुंद होते शब्द सारे...धुंद होत्या भावना..
वार्यासंगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या...

''आयुष्य'' म्हणजे वेदना .....
इथे कोणीच नसतो सुखी....प्रत्येकच असतो दुखी ..
असचं सहज मिळालं असतं सुख ......
तर मग सुखात बोर नसतो झालो का राव... 


पोटा च्या नावा खाली आयुष्याला नावं ठेवता...
पण मृत्यू समोर आला की मग का त्याला घाबरता...
आयुष्य सुंदर आहे....! नावं ठेऊ नका यार.....
नाही नाही म्हणता म्हणता झकमारत जगता ना राव.....!

पण .. 
''आयुष्य'' म्हणजे ध्यास..
अंतिम ध्येय साधण्याचा...
शेवट पर्यंत जगात राहण्याचा....

''आयुष्य'' म्हणजे त्याग ..
मातृभूमीसाठी निरपेक्ष भावनेनं केलेला...

''आयुष्य'' म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.