मैत्री
मैत्रीचं कुठलंच मोजमाप नसतं ..
न मैत्रीची असते कुठली परिभाषा ..
त्या गमती ,त्या गोष्टी,ते हसणं,ते रडणं..
नाकावरचा राग अन थोडी निराशा ..
हे नातं जितकं मुरलं, तितकंच नाजूक असतं
पिंपळपान करून त्याचं,मनाच्या पुस्तकी जपायचं असतं ..
बरेच काळ येऊन मग बरेच काळ निघून जातात ...
हरवलेल्या मैत्रीचे ठसे मात्र कायमचेच घर करून जातात ...
आठवणींच्या वाटेने जाताना मग मैत्री असे रडवून जाते ...
सावळ्या घनांच्या दाटीत जशी,पाण्याची सर भिजवून जाते .....
- निखिल