एकदा एकेवेळी एकटाच एकांतात जेव्हा होतो बसून
तूच तेव्हा तुझ्या त्या तेजल रुपात मला दिसून ,
सुंदर सोजीऱ्या सात्विक स्वप्नात स्मित सुंदर तुझे देऊन ,
गेली माझं माझेपण मग मायावी मोहितेने मोहून ,
पण परत परतलो पुन्हा पूर्वीची पायवाट पकडून ,
जाणले जेव्हा जिवंत जालीम जगाला जवळून ,
मन म्हणाले माझे मला मी मार्गं तरी हा धरला कुठून ?,
मी म्हणालो -
एकदा एकेवेळी एकटाच एकांतात जेव्हा होतो बसून ...
-निखील