महागाईला जबाबदार आपणच.....

मला वाटतं की वस्तूला किंमत नसते .ती ठरवली आहे माणसाने जर माणसाने एखाद्या वस्तूचे मूल्य १० रु ठरवले ,तर ती १० रुपयाची आणि त्याचवस्तुचे मोल त्याने १०० रु ठरवले तर ती १०० रु मोलाची होते. तसं पाहिलं तर व्यापारातून फायदा हा तेवढाच होणार मग त्या वस्तूंचे मोलवाढवण्याचे कारण काय असावे बरे . कदाचित यामागे इंग्रजांची व्यापार निती असावी (स्वार्थ)भारतातील लोकांच्या जवळील पैसा लवकर संपवावं त्याला अधिक पैसे मिळविण्याचा ह्व्यास निर्माण व्हावा व तो त्याने कोणत्याही मार्गाने मिळवावा. परिणाम आपणाला दिसतोच आहे. अण्णा लढा देत आहेत पण त्याची यशस्विता किती प्रमाणात होईल सांगता येत नाही.

मला सुचलेला उपाय :- पुन्हा एकदा स्वदेशीचा लढा..........
यामध्ये रक्त रंजीत क्रांती अपेक्षित नसून वैचारिक क्रांती अपेक्षित आहे. मला ठाऊक आहे की या समाजाला क्रांती नावाचा चित्रपट पाहायाला आवडते, ९ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा करायचा किंवा केला जातो. किंवा क्रांती सहजासहजी घडत नाही इ. या महागाईला आळाघालण्यासाठी पुन्हा एकदा वैचारिक क्रांतीची गरज आहे. नजर चुकीने शासन आपल्यासाठी काही चांगल्या योजना सांगताना दिसते आहे . आपल्याला फक्त त्या अमलांत आणावयाच्या आहेत . ग्रामसमृद्धी योजना हि जर विचारात घेतली याचा उद्देश विचारात घेतला तर बराच फरक पडू शकतो. मला यातून आपल्या देशात पूर्वी चालणारी विनिमय पद्धत सांगायची आहे. त्या काळात वस्तू विनीनय होता माणसे आनंदाने राहतं होती.महागाई चलन हा प्रकार नव्हता. जगण्यासाठी आवश्यक गोष्टी ह्या ज्यात्या गावातच लोकांना मिळत होत्या.
काळाबरोबर समाज बदलला नवीन शोध लागले. भौतिक सुखसुविधा आल्या व त्या पूर्णं करण्यासाठी साधने आली. वस्तू तीच राहिली मात्र त्यावस्तूचे मोल मात्र वाढत आहे. हे मोल वाढवतो कोण याचा विचार व्हावा.
      माणसाने आपले गांव महागाई मुक्त करावे . गावातील आवश्यक गरजा गावातच पूर्णं होतील, त्याही अल्प दरात अशी विचार सरणी असणारी माणसे या समाजात तयार व्हावीत अशी अपेक्षा आहे. पण तयार होतील तरचं पण या विचार सरणीची माणसे घडण्यासाठी त्यांना दिलं जाणारेशिक्षण हे विचार करायला लावणारे असावें. नाही असा आक्षेप नाही पण माणसाची विचार शक्ती सुद्धा या महागाईने महाग केली आहे. जे कोणी आपल्या कडून हिरावून घेऊ शकत नाही ती गोष्ट पण या महागाईने हिरावून घेतलीय. माणसं जगण्यासाठी वस्तू गहाण ठेवतात हे मी ऐकलंय पण जगताना आपली विचार शक्ती पण गहाण ठेवतात हे प्रत्यक्ष पाहायला मिळतं आपल्या देशात.
  डॉ. आंबेडकरांनी आपल्या शिक्षण विषयक विचारात म्हटले आहे की, मुलांना (समाजाला )मिळणारे प्राथमिक शिक्षण हे अतिशय दर्जेदार असावे. की, ज्या योगे ते घेणारा हा आचार विचार आणि उच्चार या त्रयीने समृद्ध होईल. मला हे सुचवायचे आहे की शिक्षण हे माणसाला वैचारिक समृद्धीच्या दिशेने नेणारे असावे . माझ्या कल्पने नुसार फक्त गांव आत्म निर्भर न होता अख्खा देश आत्म निर्भर होईल हेच विचार अनेक जण मांडतआहेत पण या देशातील जणता (काही अपवाद वगळता)हे विचार फक्त चघळतात एखाद्या च्युईंग गम सारखे व टाकून देतात . अब्दुल कलाम सुद्धा हेच सांगतात की भारत एक महासत्ता होईल पण कधी की ज्यावेळी या देशातील लोकांची विचार सरणी बदलेल त्यावेळीच.
  सांगा खरंच ना ?
तर चला आपण आपली विचार सरणी बदलूया.