रुचकर कोबी.

  • कोबी गद्दा १/२ किलो.
  • कढिपत्ता
  • हिरव्या मिरच्या
  • कोथींबीर
  • हरबर्यची डाळ
  • बटाटा
  • टोमॅटो
१५ मिनिटे
३, ४ जण

बर्याच जणांना कोबी आवडत नाही, तर त्याच्यासाठी खास वेग-वेगळ्या प्रकारे कोबीची भाजी कशी करायची ते खाली नमूद केली आहे, एक तरी आवडेल...

कोबी कोशिंबीर -->

कोबी किसून घ्यावा, त्यात ३/४ चमचे दाण्याच कुट घाला, २ चमचे लिंबू रस, चवीप्रमाणे मीठ, चिरलेली  कोथींबीर घालून मिश्रण छान हलवून घ्याव. नंतर खमंग फोडणी करून कोशिंबीरीमध्ये घालावी .

फोडणी -->  फोडणीसाठी ३/४ चमचे तेल तापवून घ्याव, त्यात १ चमचा मोहरी घालावी, मोहरी छान तडतडल्यावर त्यात ३ मिरच्यांचे तुकडे घालावे नंतर ८/१०  कढिपत्त्याची पान घालावी. मग १/२ चमचा हिंग, १ चमचा हळद.

मसाला कोबी -->

कोबी बरिक चिरून घ्यावा, त्याच बरोबर टोमॅटो चिरून घ्यावा. वर दिल्या प्रमाणे फोडणी करावी परंतु फोडणी मध्ये मिरच्यांच्या एवजी ११/२ चमचे तिखट, ११/२ चमचे गोडा मसाला व जिरे घालावे, मग टोमॅटो व कोबी, चवीप्रमाणे मीठ घालून भाजी शिजवून घ्यावी. भाजी वाढताना चिरलेली  कोथींबीर जरुर घालावी.

पीठ पेरून कोबी -->

कोबी बरिक चिरून घ्यावा, वर दिल्या प्रमाणे फोडणी करावी परंतु फोडणी मध्ये मिरच्यांच्या एवजी ११/२ चमचे तिखट घालावे. मग कोबी घालून भाजी अर्धवट शिजून घ्यावी, मग त्यामध्ये ३/४ चमचे हरबरा डाळीचे पीठ व १/२ चमचे भाजणीचे पीठ घालावे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून भाजी चांगली परतून घ्यावी.    

हरबराडाळ - बटाटा  कोबी -->

अर्धीवाटी हरबराडाळ १/२ तास भिजवून ठेवावी, बटाटयाचे साल काढून काचर्या करून घ्याव्या, कोबी बरिक चिरून घ्यावा. वर दिल्या प्रमाणे फोडणी करावी, त्यात आधी  हरबराडाळ घालून ३/४ मिनिटांनंतर मग बटाटा, कोबी चवीप्रमाणे मीठ घालून भाजी शिजवून घ्यावी. भाजी वाढताना चिरलेली  कोथींबीर, नारळाचा चव घालावे. 

कृपया  वाचा -->  कोबी का खावा

आई