मी शब्दातून...

मी शब्दांतून...

लिहिण्याला कारण काही
नुमजे मज काळी कधीही
जडला हा वेडा छंद
मी मलाच शोधत राही

साद त्या रानफुलाची
का शब्दामधुनी घेई
बरसात कृष्णमेघाची
अक्षरे धारा वाही

चिंबसा होऊनी जात
ग्रीष्मी का उन्हे वाहत
शब्द ते सुरात न्हात
संगीत हे नसानसात

मी माझा नुरतो काही
व्यापुनी दशोदिशात
मी चराचरी या मुक्त
शब्द ते मात्र निमित्त