अष्टविनायकदर्शन हे स्वा‌. सावरकरांवरील ई-बुक आता विनामूल्य (फ़्री) डाऊनलोड करता येईल.

ऊद्या स्वातंत्र्यदिन! लाखोंच्या दीर्घकाळाच्या स्वार्थत्यागानंतर आणि बलिदानानंतर आपल्याला लाभलेले भाग्य! या स्वातंत्र्यलढ्यातील

एक अग्रणी क्रांतिकारक, समाजसुधारक, महाकवी आणि राजकीय नेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! त्यांच्या मार्सेली, फ्रांस येथील त्रिखंडात गाजलेल्या उडीला ८ जुलै २०१०ला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मी "अष्टविनायकदर्शन- पण जरा वेगळे " ही लहान पुस्तिका पदरमोड करून प्रकाशित केली होती. २६ फेब्रुवारी २०११ला म्हणजे त्यांच्या पुण्यतिथीला, मी त्या पुस्तिकेचे इ-बुक प्रकाशित करून घेतले होते.

आता उद्याच्या स्वातंत्र्यदिनाची तरुणवर्गाला भेट म्हणून १ आगस्ट २०११ पासून ही पुस्तिका विनामूल्य ( फ्री ) डाऊनलोड करून घेता येईल. अष्टविनायकदर्शन हे इ-बुक २६ फेब्रुवारी २०११ ला प्रकाशित केले होते.  त्यात ४० पाने व ४१ फोटो आहेत. सावरकरांचे जीवनचरित्र, कार्य आणि विचार थोडक्यात मांडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वाचे दर्शनही त्यात घडविले आहे. सोलापुरला २००८ मध्ये झालेल्या सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध वक्ते आणि निरुपणकार श्री. विवेक घळसासी यांचा अभिप्रायही तित समाविष्ट केलेला आहे. सुमारे तासाभरात ते वाचून होते. आता ते विनामूल्य उपलब्ध आहे. तरुण मुलांनी कर्तव्य आणि कृतज्ञता भावनेने ते वाचून पाहावे असे मी आवाहन करतो.         
हे इ-बुक विनामूल्य (फ्री) डाऊनलोड करण्यासाठी
दुवा क्र. १=1 ही लिंक वापरावी.  चौदावे पुस्तक "अष्टविनायकदर्शन" हे आहे. 

आपला,
शशिकांत दामोदर गोखले.
सोलापूर