द्वैत - अद्वैत
गोकुळी शोधून किती थकले रे
कान्हा तुजला शोधू कुठे रे
कालिंदीतट आज न रंगे
दिसशी ना तू गोपांसंगे
अवचित मुरलीसूर का घुमले
पाऊल जागेवरीच खिळले
कंप असा का या हृदयाला
मुरली सूर येथून उमटला?
अंतरात मुरलीसूर घुमला
सुरात राधातनू हिंदोळा
बासरी कान्हा, सूर ही कान्हा
कान्हा राधा, राधा कान्हा
अद्वैताचा सूर आगळा
शोधावे कोणी कोणाला