आता उजाडेल या अप्रतिम अल्बमद्वारे ओंकार घैसास या तरूण संगीतकाराने संगीतक्षेत्रात आपलं पदार्पण केलय! या अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची १० गीते आहेत.
कै. श्री सुरेश भटांनी लिहिलेली "जगून मी पाहिले कितीदा" ही गझल आणि शास्रीय अंगाने जाणारं, तीनतालात बांधलेलं "बरसत आल्या अमृत धारा", "सूर आनंदघन", "उजाडेल तरी न का" या सगळ्या गाण्यांचं सुरेशजींनी आपल्या स्वरांनी सोनं केलय! या व्यतिरीक्त झी मराठी महागायिका वैशाली माडेने गायलेलं, स्पृहा जोशीने लिहिलेलं "खुळे मन माझे" हे गीत आणि मंदार आपटेसह तिने गायलेलं "आता उजाडेल" हे टायटल ट्रॅक; ही गाणीही यात आहेत.
या अल्बममधील सगळी गाणी तुम्ही आता उजाडेल या दुव्यावर ऐकू शकता. तरीही मनोगतवरील संगीतरसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा :)