शिक्षक दिन

आपल्या देशात गुरूंची थोर परंपरा आहे. म्हणूनच आपल्या जीवनात आई वाडीलानंतर शिक्षकांचे स्थान आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाच्या राष्ट्रपतीपदी पोचलेले शिक्षक. ज्येष्ठ विचारवंत, तत्त्वज्ञ, गाढे अभ्यासक असलेले डॉ. राधाकृष्णन यांनी तत्त्वज्ञान आणि धर्म या विषयावर लिहिलेली ४० हून अधिक पुस्तके त्यांच्या प्रतिभेचे, परखड विचारांचे व प्रखर विद्वत्तेचे दर्शन घडवितात. आधुनिक विचारवंतांमधला, पूर्व व पश्चिमेला जोडणारा दुवा असा त्यांचा उल्लेख केला जातो.