तुझ्या कल्पने जाहली खल्बली अन्
नजर ती तुझी मखमली काहिशी
तुला पाहता वाहता शीतळी अन् -
तरी जाहली काहिली ही अशी
तुझी सावली पावली मावली अन्
पुढे धावली कावली ती किती
मला अंगणी पाहुनी थांबली अन्
क्षणार्धात ती होतसे चोरटी
तुझ्या दर्शनाला नभी चंद्रयाने
किती सांग मी तेथ धाडायची?
तुझा चेहरा चंद्र नसला तरीही
तुझ्या भोवती तीच हिंडायची
कशाला फुकाची कुणाच्या मनाची
भिती किल्मिषांची उरी घ्यायची?
खुली रंगवू या आकाशात नक्षी
गुजे सावकाशीत सांगायची