पहिले वहिले प्रेम : अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेला नवीन अल्बम

संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेला पहिले वहिले प्रेम
हा अल्बम नुकताच प्रकाशित झाला आहे. बेला शेंडे आणि वैशाली सामंत या आजच्या
आघाडीच्या गायिकांसह नील नाडकर्णी या अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या
तरूण गायकाने या अल्बमद्वारे मराठी संगीतक्षेत्रात आपलं पदार्पण केलय! या
अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची ८ गीते आहेत असून प्रवीण दवणे, मिलींद जोशी
आणि मनोज यादव यांनी ती लिहिली आहेत. पं हरीप्रसाद चौरसिया यांचे शिष्य
श्री राकेश चौरसिया यांनी या अल्बममध्ये बासरीवादन केले आहे. या अल्बमबद्दल
अशोक पत्कींनी व्यक्त केलेली प्रतिक्रीया आणि या अल्बमधली सगळी गाणी तुम्ही
पहिले वहिले प्रेम
या दुव्यावर ऐकू शकता आणि तुमचे रेटींग्सही देऊ शकता. तरीही मनोगतवरील
संगीतरसिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा! [ टीप : संगीतरसिकांनी दिलेल्या
रेटींग्सनुसार सध्याची टॉप १० मराठी गाणी तुम्ही
दुवा क्र. १येथे ऐकू शकता! ]