मी वागलो त्यांशी मैत्रीने, प्रेमाने, इमाने
ते म्हणती तू होतास भयाण वादळा प्रमाणे
जरी मी आरोपी त्याच्या तुरुंगात
मी नव्हतोच वादळ वा वारा तुमच्या अंगणात
आज जितके तुम्ही मज शिव्या शाप दिले
तितक्याच वेळी मी आज स्वतःलाच माफ केले.........
मी गायीले एक गाणे जीवनाचे, ऐकली तुम्ही फक्त आरोळी
पोळले माझे हात, मी विझावाया गेलो होतो तुमचीच दहकती होळी
मी सावरलोही स्वतःच, घातली फुंकर हळुवार वेदनांवर
तुम्ही म्हनुणी मजला लाचार, साधले वार माझ्याच जखमांवर
म्हणता मला वणवा जंगलातला, आयुष्य आमचे जळले
त्याच राखेची घालून रांगोळी, मी आज स्वतःलाच माफ केले............
पाहिले जेव्हा तुम्हांस एकाकी, मी स्वतःचीच केली गर्दी भोवताली
पाठी ठेवला हात मी स्नेहाने, झालो अडचण, पाप हे कसले भाळी
मारीली मी जेव्हा मिठी अलगद, माझ्या हृदयात फुले होती
दचकून मला झिडकारले तेव्हा ना माझ्या हाती कुठली सुरी होती
मन होते सुगंधी माझे, फुल हृदयातले तुम्हीच कुस्करले
त्याच पाकळ्यांचे बांधून तोरण, मी आज स्वतःलाच माफ केले............
आता थकलो पुरता लढून, सुखले डोळेही अन आसवे गोठली मनात
ज्यांच्यासाठी हरलो, उरलो, तयानीच केला वध या पाप-पुण्याच्या रणात
श्वास हा अखेरचा प्रतीक्षा किती कठोर नि किती भयाण हे हृदयाचे स्पंदन
मागतो क्षमा सा~यांची तुझी त्याची जगण्याची, आता अखेरचे हे वंदन
आस अंतिम क्षणाची, कोरडा सागर मानाचा, श्वास जरी तेव्हा गुदमरले
मी त्याच श्वासांचे वादळ होवून, अखेरीस मी आज स्वतःलाच माफ केले..............
-अमोल कुंभार ०९-१०-२०११