एकटाच जगेन .......

हजारो चिंता या अशा
  अखेर मरणापर्यंत सोबत
  म्हणूनच असावी जीवनाची ज्योत
  सदैव अखंड तेवत
  मरणाला इथे कोण भितो
पण जगण्याचा आहे कंटाळा
जीवनभर का
सोसाव्यात
 या जीवघेण्या मरणप्राय कळा
  प्रवास हा सारा ज्यांच्यासाठी
  त्यांनाच हे न कळले
भरकटताना या दुनियेमध्ये
  बघ पाऊल इथवर कसे वळले
घ्यावा
म्हणतो निरोप अखेरी
  तुझा, त्याचा, माझाही
अंगी  ना आता रग उरला
  शरमली 
जगण्याची  सजा ही
जन्म दिलास खरा
 पण बळ
का आहे अपुरे
  मरण पुढे येऊन ठाकताच
  का होते मन कापरे
  म्हणतो आता पाहूच
जगून
  आपणच आपणास साथ करू
  तुझाही आता हात नको
  नव्याने करेन जीवन सुरू ...............
-अमोल