आली आली हो दिवाळी-

आली आली हो दिवाळी
ही रांगोळी सांगे दारी
स्वागतास सज्ज राहू
प्रकाशात घरोघरी !

    सुसंवादी भेटीत त्या
    काव्य शास्त्र विनोदाच्या -
    एकमेकांना देऊ या
    शुभकामना मनीच्या !

करू विना आवाजाने
छान दिवाळी साजरी ,
ठेवू प्रदूषणमुक्त
वसुंधरा ही गोजिरी !

    गोडधोड चवदार
    खमंगशा फराळात- 
    भूक गोरगरीबांची
    नित्य घेऊया ध्यानांत !