खाकरा चाट

  • पोळ्या ३ (शिळ्या असल्यास उत्तम)
  • बटाटे २ उकडुन
  • कांदा १ मध्यम
  • टोम्याटो २
  • कोथिंबीर
  • पुदिनाचटणी
  • चींचेची गोड चटणी
  • लाल तिखट पुड , जीरेपुड, मीठ
  • गोड दही .बारीक शेव
१५ मिनिटे
३ ते ४

प्रथम पोळ्यांचे चतकोर तुकडे करून तळावेत. कुरकुरीत होतात.
त्यावर उकडलेला बटाटा, कांदा, टोम्याटो ,कोथींबीर घालावी.
पुदीना व चींचेची चटणी घालावी.
शेव  व  गोड दही घालून  त्यावर लाल तीखट व जीरेपुड भुरभुरावे.
खाण्यास तयार खाकरा चाट.
मुख्य पदार्थ पोळी आहे.