साधी शेव

  • डाळीचे पिठ १ वाटी
  • १ चमचा तेल
  • १ चमचा तांद्ळाचे पीठ
  • मीठ चवीप्रमाणे
  • तेल तळण्यासाठी
१५ मिनिटे
२ते४

प्रथम तेल तापत ठेवावे. 

डाळीच्या पीठात गार तेल १ चमचा , १ चमचा तांदळाचे पीठ व मीठ चवीनुसार घालून पीठ सैलसर भिजवावे.
सोऱ्यातून अलगद पडले पाहिजे. बारीक छिद्राची ताटली लावून, तेल तापले की आच मंद करून शेव घालवी. झटकन तळली जाते.
 

वरील पीठात हळद घालू नये. लालसर रंग येतो.

ही बेसीक शेव आहे.