कोल्ड कॉफ़ी

  • (फ़ुल्ल क्रीम ) दुध १ लीटर
  • ब्रु कॉफ़ी ६ चमचे
  • साखर १२ चमचे
१० मिनिटे
६ लोकांना

१ कप दुध फ्रिजर मध्ये ठेवून घट्ट बर्फासारखे करावे.

उरलेले दुध चिल्ड ट्रे मध्ये गार करून घ्यावे.
मिक्सर मध्ये कॉफी , साखर घालून मिक्सर मिनिटभर चालवावा, नंतर त्यात गार दुध घालावे. फ्रिजर मधील दुध देखील घालावे.
१ ते २ मीनिटांपेक्षा जास्त वेळ देवू नये.
फेसाळ कोल्ड कॉफी तयार.
देताना थोडी कोरडी कॉफी भुरभुरून द्यावी

यात बर्फ घालू नये कॉफी पातळ होते, त्यासाठी फ्रीजर मधील दुध वापरावे. दुध न  तापवता नीरसे घ्यावे तर दाट कॉफी होते.