कच्च्या टोमॅटोच्या वड्या

  • कच्च्ये टोमॅटो ३
  • आले लसुण हिरवी मिरचि पेस्ट १ मोठा चमचा
  • डाळीचे पीठ साधारण २ वाट्या किंवा मिक्स पीठ ( डाळीचे+ ज्वारीचे+तांदुळाचे ...आवडीप्रमाणे )
  • मीठ चवीप्रमाणे
  • सोडा अर्धा चमचा
  • तीळ २ चमचे
  • खोबरा कीस ( ऐछिक )
३० मिनिटे
६ ते ८ लोकांसाठी

टोमॅटॉ बारीक चिरून त्यात आले , लसुण , हिरवी मिरची पेस्ट , तीळ , मीठ, सोडा घालावा.

५ मीनिटांनी त्याला पाणी सुटेल. नंतर त्यात मावेल तेवढे डाळीचे अथवा मीक्स पीठे घालावीत.
साधारण भज्यापेक्षा घट्ट असावे.
नंतर हे पीठ कुकरमध्ये १० मिनीटे  उकडून घ्यावे.
थंड झाल्यावर वड्या कापून तळाव्यात अथवा शॅलो फ्राय कराव्यात.
वाढताना त्यावर  खोबरे किसून घालावे .

अश्याच पालकाच्या पण वड्या करता येतात , पण त्यात लिंबुरस घालावा.