दानाचे मोल

राज्यात ओला दुष्काळ होत. राजा प्रतापरावांनी साऱ्या शेतकऱ्यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले. अन्नही मोफत दीले जाईल. अशी दवंडी दीली. त्यांना वाटले की. आता सगळे खूश होउन जातील, आपली स्तुती करतील. ती स्तुती एकावी म्हंणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या रांगेत उभे राहीलें. त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येउन उभे राहीले, ते आपआपसांत कूजबुजत होते. आपले महाराज शुर आहेत. दानशुर शुदधा आहेत, पण त्यांना व्यवहार समजत नाहि.

दुसरा शेतकरी दबल्या आवाजात म्हणाला, का रे? फुकटचं धान्य खाउन वर मस्तीला आलास का? राजांना नावं ठेवतोस? पहीला शेतकरी म्हणाला अगदी बरोबर बोललास, गेले महीनाभर मला काही श्रंम न करता फुकटच खाण्याची सवय लागली आहे. मस्ती आल्याशीवाय कशी राहील? यापेक्षा महाराजांनी आपाल्याकडून काही कामे करून घ्यायला हवी होती. काम मगच दाम हे धोरण त्यांनी राबवायला हवं होतं. राजा प्रतापरावानी ह सल्ला मानला, त्यामुळे दानाचा दुरुपयोग टळाला.