तु आज हवीस लाडके मजसवे
गहिवरल्या गोंधळाची आर्जवे
हाक प्रामाणिक मी तुज मारली
आक्रस्ताळी वादळ हे शमावे
हाव तुझी ग, मजला ना शोभते
देह मागे हृदय पुढे झेपावे
लोळते भावनांची पुरचूंडी
सत्यचंचीचे तोंड उघडावे
निवासी माझ्या आज मी अशांत
पडवीत कुत्रेच कसे रडावे
तुंबलेल्या तोबऱ्याचे चर्वण
नात्यांनी धोसरे काढावे
मन्मनाच्या घरट्याचे प्रतिबिंब
रांगोळी -गेरूचे ना पटावे
आठवणींचा पिवळा अमरवेल
कृशांनीच अजून किती वठावे