चौर्य

दिग्गजही करती का चौर्य

संपले का दिखाऊ धैर्य
जग मानते महान त्यांना 
जाहले कसे ते हतवीर्य
लावा आग येताजाता
लाभले कधी न मला स्थैर्य
नका डीवचू मला कोणी
मौनात मी लपवले शौर्य
ना ओळखे अक्षर तुझेच
दुर्बोध वाडःमयीन क्रौर्य