ती खरी का मी खरा ..?

ती खरी का मी खरा ..?
हे कधी कळलेच नाही 
शब्द तिचे नि शब्द माझे 
सूर कधी जुळलेच नाही 
हे न माझे हे न तिचे 
हे कधी वळलेच  नाही 
 
रंग माझे रंग तिचे 
मिसळणे जमलेच नाही  
ती अशी नि मी असा 
चिंब कधी झालोच नाही 
ती खरी का मी खरा ..?
हे कधी कळलेच नाही .