चिडायचे असेल जरी
चिडा तुम्ही स्वतःवरी
चिडुनी माझ्या यशावरी
पडेल काय तुमच्या पदरी ?
यश असे का इतुके स्वस्त ?
सहजासहजी ना ते पचत
यशाचे चणे लोखंडाचे
पोट लागे दगडाचे
लागते सर्व मांडण भक्कम
नाही मिळत देउनी रक्कम
द्वेष तुमचा तुमच्या जवळी
नष्ट करी , तो जातकुळी
म्हणुनी सांगतो ऐका माझे
पुढचे पाऊल टाका पक्के