....आईच काळीज अन आत्महत्या .....थांब बाळा चाललास कुठ ?
अजून तुला पंख फुटल्यात कुठ ?
शाळत चाललास वाटेत कुठ थांबू नगस
सांच्याला घरट्यात तुझ्या लवकर ये .....!!
शाळत गुरुजी म्हणल काही
तर मनाला लावून घेवू नगस
ढसढसून अन उसासून रडून
घराकड पाठ फिरवू नगस ......!!
पेन अन पुस्तक नाय म्हणून
मनाला नाग घेवू लावून
तुझ मास्तरबी गरीबच हाय
वाटल तर बग इचारून जावून ......!!
शाळत तुला ग्यान मिळतंय
भल अन बुर भी कळतंय
गुरुजी म्हणजी ग्यानाच पुस्तक हाय
त्यांना तू इसरशील म्हणून माझ मनं मला छळताय.....!!
पोर ! शाळ्तन तुला कालिजात जायचं हाय
बापाचं नाव मोठ करायचं हाय
नोकरीच्या जीवावर तुझ्या
माझ म्हातारपण घालवायच हाय ....!!!
परवा म्हण शाळ्तल्या पोरान
गळ्याला लावला फास
आधीच मुकल्या तुझ्या बापाला
तसला इचारही मनात आणून
कोंडू नको माझा स्वाश.....!!
@रविंद्र पाटील
9172104241