का इतकं आवडतं कोणी???

समजावणार का मला कोणी?
का हुरहुरतं मन त्यांच्यासाठी नेहमी?
का इतकं आवडतं कोणी???   ... (१)

का एक संपली की दुसरी सुरू होते कहाणी?
का तरीही दुःख चरचरते मनी?
का आठवत नाहीत काळची मंजुळ गाणी?
का इतकं आवडतं कोणी???   ... (२)

का रागावतात आपलेच आपल्यावर कोणी?
का उधाणतो समुद्र लोचनी?
का त्यांचीच येते आठवण प्रत्येक क्षणी?
का इतकं आवडतं कोणी???   ... (३)

का जपून ठेवतो सगळी नाती ध्यानी?
का तीच नाती आपल्या आयुष्यातली निर्मळ पाणी?
का ओढ लागलेली त्यांच्याच भेटीची जीवनी?
का इतकं आवडतं कोणी???   ... (४)

का ठसत राहतो त्यांचाच ठसका मनी?
का पाहुण्यांसारखी जात नाहीत काहीक आठवणी?
का अपूर्ण राहतात स्वप्न आपल्या अंगणी?
का मिळत नाही प्रत्येकाला सुखाची संगिनी?
तरीही का इतकं आवडतं कोणी???
समजावणार का मला कोणी???

- यशपाल पाटील (९९७००११८३९)