नोकरी लागल्यानंतर

...आला दिवस
गेला दिवस!
कामामध्ये बुडवून काढतो,
आयुष्याच्या अंताकडे एक टप्पा आणून सोडतो.

                  आरशात पाहिले तर प्रतिबिंब हसले पाहिजे,
                  तुझ्या स्मिताची  किमया अशी जागी ठेव.

                  मनाचं ऐकताना समाजाचं भान ठेव,
                  समाजाचं ऐकताना मन मात्र जागं ठेव.

ट्रेन, बस, गर्दी सारी
दबाव आणि कामाची घाई,
संगनमताने घड्याळ्याच्या
मन मारायला टपलेत सारे.

                     टेबलवरच्या फुलदाणीत हिरवाई जागी ठेव,
                     हिरवाईची शक्ती मनात जपून ताजी ठेव.

जुने कृष्णधवल,
रंगीत डिजिटल,
असोत कितीही
                  स्मृतीच्या संग्रहात तुझ्या एखादी आठवण "त्यांची" ठेव.