आजची चांगली गोष्ट

सकाळी ऑफिस ला जायला उशीर झाला होता वरून वेळेवर समजलं की शिनो सुट्टी मारणाराय....मग काय पायीच निघावं लागलं...
गणपती मंदिर समोर दिसताच विचार आला..आज लिफ्ट मिळाली तर.. मग मला माझंच हसू आलं......मंदिर दिसलं की नेहमी असेच विचार का येतात..हे मिळू दे..ते मिळू दे..अस होऊ दे....तसं होऊ दे..आणि त्या विश्वविधात्याकडे मागायचं पण काय तर असले चणे फुटाणे..
मस्त गाणी ऐकत निघालो....पहिलंच गाणं "प्रथम तुला वंदितो"... .ते गाणं ऐकायचा मूड नव्हता..पण म्हटलं ऐकूया, अजून.बाप्पा नाराज बिराज झाला तर......आणि परत मला हसू आलं...'तुला ऐकायचंय ऐक नाहीतर नको ऐकू..बाप्पाच काय जातंय'..पण तरी मी ते सुरूच ठेवलं.. (म्हणजे इतक्या वेळात माझा मूड पण बदलला होता म्हणा)...सगळं कळतं पण येऊन जाऊन ते 'मन' आहे....त्याला काय आवरायचं आणि काय समजावायचं.. 
दूरून एक माणूस गाडीवर बसताना दिसला.. मला त्याच्यापर्यंत पोहचायला अजून ३-४ मि. लागणार होती..म्हटलं याला लिफ्ट साठी विचारलं असत पण मी पोहोचेपर्यंत तो गाडी सुरू करून निघून जाईल..पण त्याची गाडी काही सुरू झाली नाही अन मी त्याला लिफ्ट साठी विचारलं....तो हो म्हणाला..मी बसताच मला कसा म्हणतो ...'काहा जाना है सर्'.. :) ..जसा काही तो माझीच वाट पाहत उभा होता तिथे.. 'पिंपरी चौक' मी म्हटलं, ....'पर मुझे तो वल्लभनगर जाना था पर कोइ बात नही..आपको छोड देता हु'.. .. 
त्या रस्त्यावर मला लवकर कधीच लिफ्ट मिळत नाही.अन मिळाली तरी माला आणि त्या माणसाला नेहमी विरुद्ध दिशेला जायचं असतं...असो पण आज तर माझ्यासाठी तो एक चमत्कारच झाला होता अन 'आजची चांगली गोष्ट' पण.....
"ज्याला देव हवा आहे त्यानं तो आपापला शोधावा.. ज्याला नको आहे त्यानं शोधू नये, हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे"