तीन मुक्तके

बदललेल्या जीवनपद्धतीमुळे सुचलेली ही तीन मुक्तके

******************************************

ग्लोबलायझेशन

वाण्याच्या दुकानात जाऊन मी म्हटले

जरा तांदूळ दाखवा

त्याने विचारले,  कुठल्या ब्रांडचा? 

******************************************

बालपण

माझ्या चार वर्षाच्या मुलीला

तिच्या मैत्रिणीने विचारले

तू कुठल्या डेकेअर मध्ये जातेस?

******************************************

DINKS

सकाळी उठल्यावर त्याला दारावरची पोस्ट इट दिसली

'जाताना व्यवस्थित breakfast करून जा'

निघताना त्याच पोस्ट इट वर त्याने लिहिले,  'रात्री व्यवस्थित जेवून घे'