फोडणीच्या शेवया

  • शेवया (२ मोठ्या वाट्या भरुन- कुस्करुन)
  • दाण्याचा कूट - २ चमचे , तेल, मीठ, साखर- १ चमचा, लिंबू अर्धे , कोथिंबीर, मिरच्या ३-४
  • जिरे, मोहोरी
२० मिनिटे
३-४- जण

प्रथम कढईत शेवया चांगल्या लालसर रंग येइपर्यंत कोरड्याच भाजून घ्याव्यात व एका परातीत (अथवा ताटात) खाली पेपरचा एकेरी कागद पसरून काढून घ्याव्यात. (पेपर न टाकल्यास त्या खाली ताटाला चिकटून बसतात)

मग कढईत तेलाची खमंग फोडणी करून तीत मिरच्या, जीरे व मोहोरी हिंग घालून शेवया घालाव्यात. पुन्हा नीट परतून, बेताबेताने गार पाणी घालावे (सर्व शेवया बुडतिल इतपत). नीट हलवून एक वाफ येऊ द्यावी. मग वरून दाण्याचे कूट, मीठ, साखर, लिंबूरस घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करावे व दणदणीत वाफ काढावी. सर्व शेवया एक एक धागा दिसली पाहीजे, गिच्च गोळा होता कामा नये. शेवया मऊ, मोकळ्या शिजल्या पाहीजेत. खायला देताना वरून कोथिंबीर पेरून द्यावे. 

यात कांदा, हळद वगैरे न घालता साबुदाणा खिचडीचा 'फील' आणला आहे!

आजी