पाताळ (अंडरवर्ल्ड)

बापुस वरडला,

बाला, अवरे चने नको खाऊ
कढी "पाताल" व्हईल
पाताल म्हनजे अंडरवर्ल्ड ना रे बाबो,
माकरा, कढी पाताल म्हनजे 
झाऱ्याला पाताल व्हईल
पन तु बराबर बोलतोस बाला
ह्यो म्हनना यमावरुनशाच अला हं
यम एकदा भटकंतीत भरकटला
गदा म्यान केली घाबरून दगडी कट्ट्याला
बाला, तुला सांगतो, 
यमाच्या कपालावर ए के सत्तेचालीस धारा
यम पलाला सैरावैरा
यम बोतला,
ह्या भारतांन मना कईच किंमत ना
टपकवतांन कोनलापन इथले भाई
समदीकरे, गिधाडेच चालतान पाईपायी
पोटांन कल आली यमाच्या
तवऱ्यात बोतला वीरप्पन
असे बघल्यान छप्पन यम
गोली घालीन पोटांन, 
इची बना
पुन्हा यमाची कढी पाताल
दावुद कं, राजन कं, 
लास्टला यम अला डोंबिवलीन
गल्यान चेनी, हातांन अंगठ्या बघल्या
रेड्यान ठोकली रिक्सा 
अन यमाला मंग रास तुरवला
पलता पलता नो एंट्रीन रेडा घुसला
अन मंग पोलिसांनी टो केला
भाई दादा बोलतांन, तुझ्या आसला
आमी हाव ना ईथे, तु कंला आला
पुन्ना यमाची कढी पाताल
यम बोलतो, इथे कंला पज्यान लेअर ओझोन
पावला पावला त हत इथे राक्षस-झोन
अवऱ्या तवऱ्याला माझी होते कढी पाताल
आजपासून माझ्या देशाचे नाव "पाताल"