वळणाचे पाणी त्याचा पाय
शेवटी घसरलेच
धुतल्या तांदुळाचे गढुळ चरित्र
शेवटी तरंगलेच
पाप ना मनात पण
हालचाली संशयास्पद
निर्विकार चेहरा पण
आरास संशयास्पद
तपश्चर्येत जन्म घालविण्यात
तथ्य नव्हते
मेल्यावर वटवाघुळालाही
लटकावेच लागते
साधण्यासाठी स्वार्थ
ऊपास ते सोसवत नव्हते
आजकाल सरडेच
खादी वापरत होते
ढोंग्यांनी आज पेरले "बी"
काटेरीच होते
मृगजळात रुजून "झाड"
उगवणारच नव्हते