देवालाच पलवला

शेवटाला तुलाबी पलवलाच

देवा ह्यो तं व्हनारच व्हता
तुला बी पार्वतीआई सांगतच व्हती ना
गप ऱ्हा, बन शाना
मानसाशी नको झेऊ पंगा
अता भोग अपल्या कर्माची फला
तुझा नसिबच चांगला, थोबार नाय रंगवला
निखला कपालालाच गंध लावला
केमिकलच्या तेलांन त्येन निरांजन लवला
पार असतास लासला, थोरक्यान वाचला
जास्त चालतो ना डोकां तुझा
डोक्यावर बघ कं बांधला, आता घे मजा
बघ कसा टीपटीप गलतो डोक्यावर, भोग सजा
फुलांखाली लपल्यान कं व्हईल
सापरलास तं गल्याला घट्ट हार बांधतील
आरं देवा, लोका चांगली पाया परतांन
आन तू परसन्न व्हतोस राक्षसांना
पुण्ण्याला अता जागाच नाही गाभाऱ्यानं
तुझी नाटका तरी किती रं
कधी दही, लोनी, तं कधी खातो मोदक
एक देवी पान मागतो, तं कोनी भंडारा
कोनाला नारल, तं कोनाला सफरफला
कोनाला गुलाल तं कोनाला गुल-खोबरा
अता लोकां कंटालली देवा
समद्या देवांनी एक कईतरी ठरवा आन एक कईतरी खावा
दाना पिकंना शेतांन
आन तुला रोज नवा निवेद ताटांन
मी बोतलो म्हनून चरफर नको करू
हात प मोरला तर लोका बोलतील
"चला विसर्जन करु"