मी घेऊ पाहता भरारी, स्वच्छंद आकाशी
पंख माझे छाटले मी, नव्हतो कोणी दोषी
का होती भीती ,तुमच्या थरथरत्या हाती
स्वप्नांचे घर बिखरले, उरली फक्त माती
पाहावे म्हणालो जाऊन दूर, क्षीतीजाच्या पल्याड
झिडकारले गजाना किती, मी नव्हतोच मुळी भ्याड
मी फसलो ज्या तुरुंगात, ते होते प्रेम कि माया
मी हतबल जरी आता, नको भीक नी तुमची दया
मी शोधली माझी दिशा, खडतर जरी वाट होती
पायी जरी बेड्या कितेक, भटकी माझी जात होती
मी थबकलो जेव्हा वळणावर, ती पहाट होती कसली
चोहिकडे होता सागर अफाट, तिथे जहाज माझी फ़सली