दर महिन्यान त्त्याच

ब बोलली, बाये, जा दुकानांन,

आन, मांग पाली पुढे जायाच्या गोल्या
दुकानदार बोलला
डॉक्तरची चिट्ठी आन,
त्यो बोलला,
बाये, क ला खातेस ह्या गोल्या
आसा कोनत्याच ग्रंथान नाय लिवलेला
का, लगीन असो का सना-वाराला
पाली आली त व्हईल अरथला
विश्रांती लागते, आगीजवल जाउ नये वाटते
पन , रांधा-वारायला हरकत नसते
कोनला स्पर्शल्याने कई व्हत नसते
ही तर देवानच केल्याली 
शरीर - रचना असते
अता तुच सांग मना
पाली अली तर देव जवल झेत नाय
आन नाय आली तर
समाजान कईच किंमत नाय
कईतरी ह्यान नक्कीच चूक हाय
बाये, मिनी अवरे गरंथ वाचले
पन असा कोनीच लिवल्याला नाय
देवीचा मंदिर कवा बंद असतो काय
बारा मईने काय देवी काम करत नाय
ह्या अंधशरध्धेला कोनीतरी 
थांबवायला नको का?
निसर्गनियमाने ईतर कामे झाली
तशी वेलेवर पाली आली
गोल्या ईगेशनाने निसर्ग चक्रात 
घोटाला व्हतो
चूकीच्या ऊपचाराने
कईक टायमाला समदाच
वाटोला व्हतो