देहकमंडलू

तडकले रक्तमणी

विखुरली माळ
विस्कळित देहकुबडी
गंजके श्वास - सुर 
मेंदूस पीळ
करकरणारे हुंदके
कोमेजली जीवनमाला
कंपायमान हृदयपोपडे
अश्रूंचा संप
पाचोळा आकाशगंगेचा
स्फोटात ब्रह्मगाठी
आत्माचा कावळा
काळजाचे कीर्र घर्षण
पिचका देहकमंडलू
भस्मात कपाळमोक्ष