नामंजूर! (विडंबन)

संदीप खरेंची जाहीर माफी मागून

समस्त विरहात असणाऱ्या मुलांना

सतत मुलींचा मूड जपणे - नामंजूर!
अन् त्यांची मनधरणी करणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा माझ्या जगण्याची
अन् त्यांच्या बोटावर डुलणे - नामंजूर!

मला कोणाची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या मुलीचे ते प्रेम नको
नको मला, तिचे शाप अन् सदिच्छा
प्रेमाचा तो खेळ मांडणे - नामंजूर!

आयुष्याचा विनाश माझ्या! कारण ती!
तिच्याकडे हृदय ठेवले तारण मी!
सुंदरतेवर झाले जगणे चक्काचूर
अन् मुलींचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवे - फ़ुगवे... भांडणतंटे... लाख कळा
तिच्यासाठी सहन केला त्रास सगळा
चोख उत्तर तिथेच द्यावे अन् बोलावे
मुलींचे कोणे गार्‍हाणे -  नामंजूर!

तिने मला कधी आपले मानले नाही
मन माझे कधीच तिने जाणले नाही
चुका मान्य करणारी एकही दिसली नाही
मुली असल्या मी अद्याप पहिल्या नाही

प्रेमळ तत्वे... फ़सवे इशारे! दूर बरी!
एकटं जगण्याची आहे मजा खरी!
जगण्यासाठी एकटे राहणे मज समजे
पण तिच्यासाठीच मरणे - नामंजूर!

प्रसाद पासे