~~~तूच तू माझे जीवन ~~~
तुझे डोळे ... की नशा ही
हे काजळ ... की निशा ही
मी वेडावून जातो
या लाटेत ~~वाहातो...
तूच तु .. माझे जीवन
तुझ्या श्वासांची ... मखमल
किती नाजुकशी ... कोमल
तो स्पर्श, ती धुंदी
मी बेहोश .. बंदी
कधी चंचल.. मृगनयना तू
कधी भावुक ..मोरपिसारा तू
तू सळसळ पानांची
तू गंधित.. वऱ्याची
तूच तू माझे जीवन~~
कधी लटका .. राग थोडा
कधी हसरा ..मंद वारा
तू रिमझिम रंगांची
तू रेशिम ..किरणांची
माझ्या नजरेने .. पहा तू
माझ्या डोळ्यात राहा तू
तू आशा .. स्वपनांची
तू राधा.. या कृष्णाची
तूच तू .. माझे जीवन ~~~~