सम्दाच झोलझाल

डोले चोलीतच सकाली उठलो

दात घासायला लागलो
साला निरालाच वास अला
मीनी ओडोमास लावला व्हता ब्रशला 
रास गुलन्या केल्या 
पन काय नाय गेला
तोंडान लय ऊंगल्या केल्या
शेवटाला दाढ लगली उकलायला
दाताच्या डाक्तरकडे मी "आ" केला
वासाने डास लगले ऊरायला
डास सगले पलाल्यावर 
त्यो डाक्तर दारेला लोंबकालला
आर. सी. सी. का कं कईतरी बोतला
मी बोतलो ' पायाभरनी' करतंस त कर
का आता नारल पजे ऊदघाटन करायला
... दाताच्या डॉक्तरने लय "चुना" लवला
... मंग एक्सऱ्याची "सुपारी " दिली
... नव्या संकटाचा "पान" वाढला
... माझा खिसा कराकरा "कात"रला
.... अवरा करून वर पुढल्या टायमाच्या
      वेलेचा कागद दातावर मरला.
तोंडाचा आरकित्ता बंद
आनपानीबी बंद
दवापान्यान जरा वाटला 
मना वाटला औषध खपला
बाटली गेलो जोरान दाबायला
एक थेंब जोरान उराला
गेला डोल्यान डायरेक
आन म्या लगलो बोबलायला
दोल्याच्या डाक्तरने बंब बोलावला
माझा डोला धुतला
चिकन्या गोल्या दिल्या खायाला
मंग क बघशील
सगल्या अंगाला यार, गांधी
खुजली लागली नाचायला
चामडी लोलवली त्या डाक्तरने
मी मेलो तर ह्या साल्याला
माझ्या चामरीचे जोरे करून तुरवा
असा मृत्यूपत्रच केला
सुस्ती आली
पृथ्वी वेगाने पलत होती
माझ्या छातीत रणगाडे
कोनीतरी जिभेखाली गोली टकली
आन मी थंडगार
डोक्यान चिमुकले डायनासोर
कबर्री कबर्री लागले खेलायला
सगला झोलझाल कसाई डाक्तरांचा
मनाच येरा ठरवला
कंची गोली जिभेखाली टकली कोन जनू
ओडोमासचा वास परत आला
दाढपन परत लागली ऊकलायला
माझा थर्रीकाप होला
"असंभव"च्या डोकऱ्यसारखा
लटलटत मी बोतलो
"एक चक्र पूर्ण झाले"
जुनी पात्रे आता नवा खेल खेलतील