बालाला जीभ दावर असे बोलून
डॉक्टर बाहेर गेला मोबाईल घेवून
परत येतो आन बघतो त क
बाला अजून जीभ भायेर कारून बसलेला
इचारले त बोतला
तुनी कुठ संगला तोंड मिटकायला
______
बायेला डॉक्टर बोलला
ईंजेक्शन घे मनगटावर(दंडाला बऱ्याच वेळा मनगट म्हणतात)
बाई घाबरली होती
डॉक्टर बोलला बाय हात ठेव मांडीवर
बाईने डॉक्टरच्या माडीवर हात ठेवला
______
बाये ईंजेक्शन कुल्यावर घ्यायला लागेल
कालन्या दुसऱ्या डॉक्टरने ह्या बाजुला दिला आहे
असे का? मग दुसऱ्या कुल्यावर घे
बाई टेबलवर ऊभी राहिली गोल फिरली
मग परत एक कुशीवर झोपली
डॉक्टरला क्षणभर वेड लागले
हीने टेबलावर नक्की काय केले?
______
पोट तपासताना विचित्र आवाज आला
तोच आवाज प्रत्येकवेळी
शेवटी कळले डोकरीने कमरेला
काडेपेटी होती खोचलेली
(जुन्या बायका अजुनही बिड्या ओढतात)
______
जखमेला काय लावले आहे थेट?
सोफ्रामायसीन का?
नाही डॉक्टर : कोलगेट
हे काय चमकत आहे जखमेवर
मॅक्सफ्रेश कोलगेट आहे डॉक्टर
______
कानात सफेद काय दिसते आहे?
डॉक्टर दाढ दुखत होती, सुजली आहे
म्हणून कानात औषध घातले आहे
(अजुनही अशी औषधे देणारे वैदू आहेत)
______
कुत्रा चावला आहे तर घे ईंजेक्शने
मी गावठू औषध घ्यायला गेलो होतो
काय?
तुझ्या पोटान कुत्र्याची पिली होली त
लघवीनशा परतील असा बोलला तो
__
(कुठल्यातरी झाडपाल्याने पाण्यावर
लघवी केल्यास काहीतरी वळवळल्यासारखे दिसते)
______
(केवळ विनोदनिर्मिती हा हेतू , कोणाला दुखावणे
हा ऊद्देश नाही)