एका समारंभात हेडसर बोलले
मुलांना पैसे देऊ नका एव्हढाले
काही दिवसांनी बघतात ते नवलाने
एक हजाराची नोट आणली होती एकाने
...
शालंन गेलास बाला त दोन रुपं देईन
दुकानानशा कईतरी खायाला घेईन
मास्तर रागावला त मी त्याला मारीन
आई कौतुकाने सांगते
तुमीच बघा ह्यो सुधरल का
शिव्या द्यायाचा बंद व्हईल का
...
परिणामः
बौद्धिक चढाओढीपेक्षा आर्थिक शिरजोरी
हे शिक्षण हीच भावी आयुष्याची शिदोरी
डॉक्तरला मारू हा बाला आपन
कोनला ना कोनला मारायलाच पजे
ह्यो पयला धरा गिरवू आपन
पोराला आंगन झारायला लावला
साला गुरुजी ह का कोन
ह्यासाठी का सालेन पाठवला
मीनी मरलाच असता त्याला
बापुस मरतो आईला
ऐकले नाही तर पोरगाही मारतो आईला
बाईला मारायचे असते
धडा आनखी एक गिरवून झाला
सांग तुझ्या आईला
बाबा गेला नवी अस आनायला
लानपनीच ऐकलेला
मंग काय बाला, लगीन होला तरी
नव्या बाईच्या माग लागलेला
डाक्टर, ह्यो बिंधास बीअर पीतो
बीअरला कईच समजत नाही ह्यो
परवा त मीनी बालाला दुकानान धारला
आन बाला क्वार्टर झेवून आला
रास हुशार हाये माझा बाला
गनपतींन बाला जुगार खेलला
रासच जितला
घरान आनंद सर्व्याना झाला
कसला भारी खेलतो बाला..
*(काही चुकीच्या चालीरिती येथे मांडल्या आहेत
बदलणे गरजेचे आहे. अनेक चांगल्याही पद्धती
आहेत त्याही देईनच लवकरच)
दुर्दैवाने आज सभ्य माणसाला जगणे कठीण झाले आहे
तेंव्हा हे शिक्षण बरोबर आहे की काय, अशीही पाल चुकचुकते.