तुलस

जय हरि, माऊली, बोलला एक माळकरी

मी वंदन करून विचारले, काय घेतले करी
तुलसीमाल हाये बाला, उत्तर मिलाले सत्त्वरी
ह्या देहावर मी तुलसीमाल ठेवली
हा देह भगवंताचा, माझा नाही
मालकी माझी आता ना उरली
१)समुद्रमंथनानशा जवा अमृत निघाले
तवा काही थेंब जमिनीवर सांडले
रोप तुळशीचे त्यातुन जन्मले
ब्रह्मदेवाने ते रोप विष्णुला दिले
(स्कंदपुराण. २४८)
२)जालंदराची भार्या वृंदा खुप दमली
हिच्या घामापासून तुलस जन्मली
विष्णुने रुप बदलून वृंदेची फजिस्ती केली
वृंदेने चितेत ऊडी मारली
विष्णुला दुखाःने मिठी मारली
तिन्ही देवता प्रकट झाल्या
प्रत्येकीने एक बी देवानी वृदेच्या चितेवर पेरली
धात्री, मालती, तुलसी प्रकटली
वृंदेचे प्रतिक, तुलसीला वैकंठी नेले
(पद्म पुराण)
...तुळशी वृंदावनात राहू लागली
३) तुळशी ब्राह्मणाची मुलगी
विठोबाच्या प्रेमात पडली
रुक्मिणी नाराज झाली
तुळशी भुमीगत झाली
वनस्पतीच्या रुपाने पुन्हा जन्म पावली
विठोबाची तुळशी पत्नी झाली
दारी तुळशी वृंदावन असावे
आसपासचे वातावरण प्रसन्न व्हावे
औषधी ही तुलस 
हीच्या ध्यानाने, दर्शनाने, स्पर्शाने, नमनाने
पुजनाने, रोपनाने, सेवनाने
अंतर्बाह्य शुद्ध व्हावे.
तुळशीच्या मुळात सर्व तीर्थे,मध्यात ब्रह्मा
अग्रभागी वेदशास्त्रे वास करतात,
लक्ष्मी छायेतच राहते आणि
विष्णू तीच्या मुळाशी राहतात 
गळ्यातील माला पापांचा नाश करते
भगवंत सतत साथ असल्याचे भासते
आणि आपोआपच मन स्वच्छ राहाते
पुर्वजांनी अशी वर्णिली तुलस गाथा
देवाशी संबंध जोडून दाखविली आस्था
खरे तर नष्ट न व्हावी म्हणून केली व्यवस्था
महिमा सांगे आणि बोले माळकरी
जय जय रामकृष्ण हरी
रामाचा आचार, कृष्णाचा विचार
हरिचा ऊच्चार, 
तुलसीमाला लेवून वारकरी
जयजयकार करी