प्राणपक्षी चालला हे जाणतो पक्षी
व्यर्थ गेला जन्म हा जाणतो पक्षी
धूर नात्यांचा निघाला जाणतो पक्षी
झोपडी निष्पाप होती जाणतो पक्षी
छाटली फांदी उगीचच माणसाने या
वृक्ष का हे वाळले ते जाणतो पक्षी
फाटला संसार आता देव ना रक्षी
वल्गना नादान खोट्या जाणतो पक्षी
बांधतो मी बांधलेले हात हे वक्षी
मान खाली घालणे हे जाणतो पक्षी
ही कशी आहे नशा चेकाळल्या अक्षी
स्वप्न-चिंध्याचे सडे हे जाणतो पक्षी
काळजाला माझिया ही देखणी नक्षी
राख रांगोळीच भाळी जाणतो पक्षी