मुल अर्थ, देवाच्या जयजयकाराचे

गंपतीबाप्पा मोरया

मंगलमुर्ती मोरया
रोज बोलतो आरती करताना
पन आसा परस्न परतो ह्यो मोरया कं हं
कार्तिकस्वामींचा वाहन मोर.. म्हनून मोरया
मयुरेश्वर.. म्हनून मोरया
मोरया गोसावी.. म्हनून मोरया
पन बाला मना एक पटलेला आर्थ आसा
गन-पती म्हनजे गनांचा पती
सैन्याचा सेनापती
लोक संकटान हायेत देवा
देवांच्या देवा तुमी आता "म्होरं या"
पुढे येऊन भक्तांचे रक्षण करा
देवा "म्होरं या " मंग नंतर कवातरी
त्याचा होला मोरया
...
दादूस, लय थकलो बघ
का र?, गेल्तो जेजुरीला 
खडोबाला भाच्यासच्या लगनाचा 
गोंधल घालायाला
रास नाचकाम केला 
निखला गजर केला देवाचा
"येलकोट येलकोट जय मल्हार"
"येलकोट येलकोट जय मल्हार"
पन ह्यो येलकोट क ह
लोका बोल्तान मी पन बोलतो
... बाला, 
'योल' म्हंजी कानडी भाषेन सात
आसा बघ, 
'कोट' म्हंजी किल्ला
सात किल्ल्यांच्या वर वसलेली टेकडी 
ती म्हनजे "येलकोट"
आन,
मणी अन भद्र ह्या मल्लांचा संहार
म्हंजी ह्या राक्षसांना जो हारवतो 
तो मल्हार
म्हनून देवाचा गजर करताना बोलतान
"येलकोट येलकोट जय मल्हार"
...... (ऊल्लेखः केदारविजय. ‍ ज्योतिबाची पोथी)
...
आसाच
ज्योतिबाच्या नावानं चांग भल
म्हणजे, देवा भक्तांचे चांगल होऊ दे, भल होऊ दे
...
अंबाबाईचा ऊदो ऊदो
माते, भक्तांना ऊदंड आयुष्य, ऊदंड सौख्य लाभू दे
...
"जय जय रामकृष्ण हरि"
रामाचा आचार
कृष्णाचा विचार
आणि हरिचा ऊच्चार
...
प्रत्येक शब्दाचा अर्थ लागतो बाला
जरा जरका ईचार केला
बघ थोरासा का होई
ना उलगरा झाला
 
उद्या मना ईचारशील
ह्यो नमस्कार म्हंजे क
आशीर्वाद म्हंजे क
बाला, मना ह्यो कोनि नाय सिकविला
गरंथ वाचताना फक्त भेजा जरा ऊघरा ठेवला