नमस्कार

माझ्या नको ग पाया परु पोरी

पोर बोलली,मामा, सासरी चालले आता
तुला नमस्कार करतो आन जातो नव्या घरी
डोल्यान माझ्या पानी आला
मन भरून अला
जा पोरी सुखाने बोतलो खरा
पन मनान सवाल ऊठले सतरा
मी त वारकरी, दिसतील ते पाय पंढरीचे
पन माझे पाय नाहीत नमस्कार स्विकारायच्या लायकीचे
क जादू हाय अवरी नमस्कारान
लहरी हातानशा वाहतान
हाताला हात जोरले आन 
मन आला बघ ताब्यान
"न मम" म्हनजे माझा नाही
जिथे मी, माझा ह्यो अहंभाव गलून परतो
त्याला बोलतान "नमहा' म्हंजे 
"नमस्कार"
अहं नाही असा संस्कार तो नमस्कार
नम्रपनाचा अंगिकार तो नमस्कार
आदर व्यक्त करतो तो नमस्कार
नमस्कारांन पन दोन प्रकार हायेत
१) पंचांग:हात, पाय, वाणी, मस्तक, बुद्धी
२) अष्टांग: हात, पाय,  वाणी, मस्तक, बुद्धी
              छाती, दृष्टी, गुडघे
देवाचे, गुरुचे, साधुसंतांचे समोर लीन व्हावे
आणि टेकावे, हृदय, मस्तक, दोन्ही हात,
                  दोन्ही पाय,दोन्ही गुडघे जमिनीला 
                  अष्टांग प्रणाम असा नाव त्याला
नमस्काराचे आनखी तीन प्रकार परतात
कायिक, वाचिक, मानसिक असे बोलतात
कायिक नमस्कार श्रेष्ठ समजतात
ह्यालाच साष्टांग नमस्कार म्हणतात
चरणावर मस्तक ठेवणे,
पुज्य व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे
तोच हात आपल्या नेत्रांना लावणे
मान खाली वाकवणे
असे नमस्कारही योग्यवेळी करणे
नम्रता, ऋजुता अंगी बाणवणे
आणि महानता हिंदू संस्कृती दाखविणे
हातावरच्या सर्व बिंदुंना जागृत करणे
समोरच्याला स्पर्शही न करता भावना पोहोचविणे
नमस्काराची ही विविध लक्षणे
मी सदभावनेने पायाला हात लावणे
त्या व्यक्तीने पाठीवर हात ठेवणे
वंदन आशीर्वादाचे वर्तुळ पुर्ण होणे
त्या पोरीला मी आशीर्वाद दिला
नमस्काराला प्रतिसाद दिला
नमस्कार पुर्वजांना केला
ज्यांनी ह्या नमस्काराचा पायंडा पाडला
"नमस्कार"