स्वस्तिक

दादांनो, पासोरी (अंतरपाट) जरा नीट धरा

पासोरीवर कोनितरी स्वस्तिक कारा
नवरा-नवरीच्या पायावर स्वस्तिक 
घरात, घराच्या बाहेर स्वस्तिक
देवलांन स्वस्तिक, देव्हाऱ्यान स्वस्तिक
कपालावर स्वस्तिक, डोक्यावर स्वस्तिक(मुंजीत काढतात)
झेंड्यावर स्वस्तिक(नाझींच्या), मुद्रेवर स्वस्तिक
क ला कारतान ह्यो स्वस्तिक
भारतातच नाय तर जगभरांन स्वस्तिक
जमिनीवरच नाय तर जमिनीखालीबी स्वस्तिक
(मोहेंजोदारोत स्वस्तिक सापडल्याचा ऊल्लेख आहे)
एक ऊभी रेषा आणि
तेव्हढीच एक आडवी रेषा
ज्योतिर्लींग विश्वोत्पतीचे मुळ कारण
उभ्या रेषेने दर्शविले म्हणून
आडवी रेषा म्हणजे सृष्टीचा विस्तार
भुतसृष्टी निर्माण करणारा ईश्वर
देवतांनी साह्य करून केला प्रसार
स्वस्तिकाचा आहे हा मुळ आधार
मंगल चिन्ह आहे हे स्वस्तिक
अति प्राचीन मानवाचे हे कौतिक
सर्वात पहिले धर्मप्रतीक
ईंद्र , वायु, सूर्य, वरुण
ह्यांचे दर्शन हे स्वस्तिक
मध्यात ही भूतधात्री वसुंधरा
"देवतांची शक्ती आणि मानवाची शुभ कामना"
संमीलित सामर्थ्याचे प्रतिक हे स्वस्तिक
सु+अस असा धातू
सु म्हणजे शुभ, मंगल व कल्याणप्रद
अस म्हणजे सत्ता
स्वस्तिक म्हणजे कल्याणाची सत्ता
डावे स्वस्तिक आपण मानतो
प्रदक्षिणामार्ग हा मुळ मानतो
डावे-ऊजवे दोन्हीपण शुभ
वापरावे श्रद्धेने तसे होतील लाभ
अंतरपाटावरील स्वस्तिकावर नजर ठेवावे
शांती, समृद्धी, आणि मांगल्य लाभावे
स्वस्तिकाचा संबंध सुर्याशी
फुलीभोवती चक्र काढले की सुर्यास गाठसी
उभ्या फुलीला एक तिरपी फुली
आकृती आठ आऱ्याची ही वेगली
वर त्रिकोनी टोपी घातली
बघ अष्टदल कमल फुलली 
रेष ऊभी वलवली
त्रिशुलाची टोके झाली
शिवाला आवरली
सूर्य आणि विष्णूआहेत एक
स्वस्तिक म्हनजे विष्णुचे चार हात
असे हे स्वस्तिक-विश्वधारक
स्वस्तिकाचा मध्यबिंदू हे नाभिकमल विष्णुचे
स्थान सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचे
कालीचे, नारीतत्त्वाचे ते डावे स्वस्तिक
गणेशाचे , नरतत्त्वाचे ते ऊजवे स्वस्तिक
असे हे स्वस्तिक
मांगल्याचे प्रतिक, जगात मान्यता
जेथे असते तेथे
नांदते कल्याणाची सत्ता
(आधारः श्रीकाका, काही ग्रंथ, व आंतरजाल)