बदनाम करतात आख्खा समाज

सुसाट चालवतो बाला गारी

चुक आपली तरी समोरच्याला मारी
ओव्हरटेक करतो रुबाबात, शाना समजतो स्वतःला
जरा इच्यार केला तर समजेल
समोरच्यान तुला जागा दिली जायाला
नायतर जागेवरच आस्तास मेला
सिग्नल नाय, निसता होर्न वाजवतो
भांडून वर नुकसानभरपाई मागतो
आरवी तिडवी पार्क करतो
आन सगल्यांनाच तरास देतो
रस्त्यावर बिल्डिंगचा मटेरिअल
गारीपन आरवी, चार पोरा घेउन जगाची टिंगल
कालचा गोवारी अता चैनी गल्यान भारीभारी
सायकल कवा बघितली नाय
जागा ईकल्या बापजाद्यांच्या
लाखाच्या गारीला आता फरका पन मारत नाय
कुराच्या झोपऱ्या, फाटके कपरे
कमरेला लुंगी, डोक्यावर पाटी
सम्दा इसरला ना रे बाला
"थुकल्याल चाटनार नाही"
असे बोलनारे आपले पुर्वज
आता बाला तु खोटेच जापायला लगला
पाठ फिरली की जबान फ़िरवायला लगला
पुरच्या पिरीची चिंता नाही तुला
पज्यान फक्त रोज दारवा आन मटना खायाला
दोन नंबरच्या धंद्याचे आता लागले यार
रातीन समदा करोडोंचा बाजार
दारू, रेती, खदानी आनी
बेकायदेशीर बिल्डींगी
कोनी "शेठ" बोतला का खुष
अता तर कं, कमरेला हत्यार
मना एक कवाच कलला नाय
ज्या मान्साचा धंदा दोन नंबरचा
त्याला लायसन देताना सर्कार क झोपल्याला अस्तो
ह्याला धोका आसतो पोलिसांपासून
आन पोलिसच त्याला देतान रिवालर
हाल्ली क? तर बोलतो, बिल्डर बनतो
मालकाला चालीस टक्के तर बिल्डरला साठ
जागा पन राते तशीच नावावर
ऊद्या गाला, रुम झेनाऱ्याला कलनार पन नाय
कुठ आन क घोटाला होला
रिझर्वेशनच्या जागेवर सम्दा कंट्र्क्शन
सरकार घेतो एक्शन सगल्यांची पोटा भरल्यावर
नम्रपना नावाला रायला 
डोका आकाशात उरवून
गारीचा होर्न वाजवून
समोरचा राम राम करतो
मेहेरबानी म्हनून
अजून कुठेतरी आशा हाय
कोनी वारकरी होतो हाय 
त कोनी बैठकीला जातो हाय
शालेचा महत्त्व आता कलल्याला हाय
सद्गुरू सावलाराम बाबा प्रत्येक किर्तनाच्या शेवटाला
सांगायला कवाच नाय विसरला
"शालेन पाठव र बाबा पोरीला"
पोरी लागल्या शिकायला
पन नवा परश्न आता ऊभा लागला रायला
पोरा भाईगीरीन मस्त
योग्यतेचा नवरा नाय मिलत पोरीला
(परवा आमच्या एक सहकारी कवियित्रीच्या रस्त्याच्या कडेला
लावलेल्या गाडीला दारू पिलेल्या बेधुंद गाववाल्यांनी जोरदार
धडक दिली. 
चुक काही लोक करतात पण आख्खा समाज बदनाम होतो
वरील लिखाण कोणाला दुखविण्यासाठी नाही.
समाजातले चांगले लोक, समाजाची माणुसकी
ह्या असल्या लोकांमुळे बदनाम होते, ह्या उद्वीग्नतेतून हा लिखाणप्रपंच).