दोस्तहो, एकदा तरी प्रेमात पडून पहा
एका क्षणात सारं जग विसरून तर बघा।
दिवसा होतील रात्रीच्या चांदण्याचे भास
डोळ्यांपुढती उभी राहील स्वप्नांचीच रास
म्हणून म्हणतो दोस्तो प्रेमात पडा खास
सार्या जगाला विसरण्याचा फुकटात मिळवा पास।
कधीतरी छातीमध्ये सोसा थोडी कळ
नंतर त्याचे मिळेल बघा गोड-गोड फळ
झटकून टाका आयुष्यातील उरला-सुरला मळ
बघा, तुमच्या प्रेमा कसे मिळेल मोठे बळ
दुनिया सारी छूठ अन् तुम्हीच तेवढे सच्चे
असले विचार आले की, प्रेम समजा पक्के
प्रेमासाठी वाटेल तुम्ही महाल अन् मक्के
मिळतील तुम्हाला हळूहळू सुखाचे एकेक धक्के
मातील गेलं जगणं अन् मातीत गेलं मरणं,
मातीमधून आलो आहोत मातीमध्येच सरणं
म्हणून म्हणतो दोस्तहो प्रेमात पडून पहा
एकदा तरी सारं जग विसरून तर बघा