घंटानाद

घंटा मोठी बांधली देवलाच्या दाराला

क असा करतान म्हाईत न्हवता कुनाला
मिनी ईच्यारले एका बाबाला
तो बोलला,ह्या घंटेच्या आवाजाने
अहंकार सांगला हाये हीथच ठेवायला
देवलान जाताना जरा हो मनान मोकला
घंटेचा क संबंध र बाबा?
ही घंटा तमोगुनाची हाये
हीच्या खाली ऊभा ऱ्हायला
आन घंटा वाजवायला लगला तर
लहरी निघतांन शरीरान घुसायला
आन राग, अहं, माज लागतो पलायला
मत्सर, लोभ, मोह लय लागले वाढायला
ते घालवायला घंटेचा आकार मोठा झाला
मंदिरात प्रवेश केला
घंटा दुसरी गेलो वाजवायला
हीचा आकार जरा लहान वाटला
बाबा बोलला, ही रजोगुनाची घंटा
हीच्या खाली ऊभा राहून लाग वाजवायला
रजोगुण जातील लयाला
पुढे गाभाऱ्याशी छोटी घंटा
सत्त्वगुणाची ही घंटा
देवाच्या पायशी तुमी आला
सत्त्वगुणाने देवाला पुजिला
मन प्रसन्न होला
अशा तीन गुणाच्या ह्या घंट
मना कलला बाबा महत्त्व ह्या घंटेचा
पन बाबा, मुल ऊद्देश क घंटेचा?
पोरा, घंटा ह्यो हाये नाद
चांगला आन वाईटबी
ह्यान आवाहनबी हाये 
आन सुचनाबी हाये
चर्चबेल हेच सांगते
साऱ्या धर्मांन घंटा दुमदुमते
अवरा आवाज बी होतो 
आन कायम टीकते ही घंटा
बाबा कशाची बनवतान ही घंटा
तांबा, लोखंड आनी टीनचा सल्फाईड
ह्यांचा बनतो स्टॅनाईट
ह्याची बनते घंटा,
कोनी बोलतो पंचधातुची
जशी मुलुखमैदान तोफ विजापुरची
 
घंटा तशी लय पुरानी
१७५१ मध्ये लिबर्टी बेलची कहानी
स्वातंत्र्याची ही निशानी
१५०० सालीच हीचा आकार ठरवला
जास्तीत जास्त लहरी हा निकष लावला
भुमिती, गणित वापरून मग घंटा आली जन्माला
हिंदुनी घंटेला लई मान दिला
पुजा करताना घंटानाद किनकिनला
घंटेवर देव अस्तान वास्तव्याला
घंटा सांप्रदायाप्रमाने निराली
घंटा महादेवाची प्रतिक बनली
घंटेवर देवादिकांची मुर्ती वसली
चांगल्या शक्तींनो आत या
दुष्टांनो घराबाहेर व्हा 
कंपनाची ही घंटा
देव्हाऱ्यात घंटा एकीकडे
शंख असतो दुसरीकडे
नाद दोघेही करती की घालती साकडे
अशी घंटा असते बाला
साद अज्ञात जगाला 
संबंध देवलाशी आला
की आवाज धीर देतो मनाला
ईश्वर सत्य है.. ‌
सत्यही शिव है...
शिवही सुंदर है....
हे सांगतो तो घंटेचा नाद आहे.