बाप्पाच बोलले एकदा
मला दुर्वा अर्पण करणाऱ्याला
भय जाईल लयाला
शांती, सौख्य, बुद्धी लाभेल त्याला
ही संजीवनी आहे, अमृत आहे
सौभाग्य, संतती देणारी
आणि कार्य सिद्ध करणारी आहे
तिलोत्तमेच्या नाचाने यम मोहित झाला
अनलासुराचा मग जन्म झाला
हैराण सारे देव त्याने केले
गणपतीने बालरुप घेतले
अनलासुराला गिळून टाकले
लाही लाही झाली बाप्पाच्या अंगाची
८८सहस्त्र मुनी तेथे जमले
२१ दुर्वानी बाप्पाला पुजिले
मस्तकावर दुर्वा पडताच
बाप्पाला बरे वाटले
अतिप्राचीन ही दुर्वा
ऋग्वेदात सापडते ही दुर्वा
अत्यंत औषधी ही दुर्वा
प्रजोत्पादक, वंशवर्धक ही दुर्वा
सीता चालली होती भुमातेच्या पोटात
राम धावला पण केस आले हातात
तीच्या दुर्वा झाल्या म्हणतात
समुद्रमंथनात मंदार पर्वत गरगरला
विष्णुने त्याला अंगावर घेतले
अंगावर केस दुर ऊडाले
लाटांनी ते तीरावर नेले
दुर्वा नावाचे रोपटे जन्माला आले
दुर्वेचा संस्कृत अर्थ
दाहू आणि अवम पासून हा शब्द आला
दाहू म्हणजे जे दुर आहे ते
ते जवळ आणणारे ते तत्त्व
असे हे तत्त्व, शब्दशः अर्थ
कापलेले किंवा प्राण्यांनी खाल्लेले
काळी आणि पांढरी दुर्वा
सुश्रुताने हीचे महत्त्व जाणले
सात्त्विक ही दुर्वा
रज तमावर नियंत्रण ठेवते ही दुर्वा
महत्त्व एकवीस आकड्याला
अथर्ववेदाने तो वर्णिला
५ धातू +५ तत्त्वे+५ ईंद्रिये
+५संवेदना पद्धती +प्राण
एकविसाव्या दुर्वेला
गणपतीचा दाह क्षमला
म्हणून महत्त्व २१ अंकाला
बाप्पाच ठरवितो आपले
भुत, भविष्य, वर्तमान
म्हणून दुर्वेला हा मान
त्रिदलाचा हा सन्मान
स्त्रोत :(श्रीकाका, आंतरजाल, आणि काही स्वतःच्या कल्पना)